गणेशोत्सव मंडळाची माहिती

अखिल खेतवाडीतील सर्वात पहिला गणपती. खेतवाडीच्या विघ्नहर्त्याची स्थापना सन १९३७ साली झाली. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ ब्रिटीशांची काळी राजवट, हुकुमत व अत्याचारांचा जोश वाढत होता. ”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच“ या ठाम मतावर असणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी एकजुटीसाठी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव ब्रिटीशांची देशाबाहेर हकालपट्टी करण्यासाठी व जनजागृतीसाठी मांडलेले प्रस्ताव व मते यांचे प्रोस्ताहन घेऊन खेतवाडी २रि ३रि गल्ली सन १९३७ काळातील एक शूर, हिम्मतवादी गणेशभक्त भोलाराम मारुती चोरगे यांनी गणेश भुवनच्या (जुनी डायाभाई घेलाभाई चाळ) ओट्यावर गणेश स्थापना केली. त्यांना हिम्मतीने साथ दिली ती बटर दादा, मद्रास, धर्मा आणि आकारामबुआ यांनी. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या ह्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने गणेशोस्तव साजरा करू लागले. सन १९४२ च्या काळचा एक प्रसंग घडला तो असा …. गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीजवळ ब्रिटीश सैनिक आले आणि त्यांनी विचारले,” ये कौन है ?” आमच्या कार्यकर्त्यांनी धाडसाने उत्तर दिले – “ये हमारा भगवान है” ब्रिटीश सैनिक उर्मटपणे म्हणाले - “तुम्हारा भगवान तुम्हारे घरमे रखो, यहा नही चाहिये”…. पण ह्या कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता गणेशोस्तव उस्ताहने साजरा केला.

३ ते ४ वर्षे गणेश भुवनच्या हरिकिसन पी. लोहार ह्यांच्या ओट्यावर गणेशोत्सव साजरा करून नंतर त्यांनी दाजीबा हाऊसचे मालक कृष्णराव बाळकृष्ण पडते यांच्या ओट्यावर मोठ्या दिमाखात स्थापनाकेली. हि जागा एवढी भाग्यवान ठरली कि, ह्या ओट्यावर श्रीची मूर्ती बरीच वर्षे विराजमान होती. हळू हळू मंडळात कार्यकर्त्यांची भर पडू लागली, गल्लीतील प्रत्येक घरातून एक दोन कार्यकर्ते तरी मंडळात सामील झाले. स्वतःच्या खिशातले पैसे खर्रच करून सुरु केलेला हा गणेशोस्तव वर्गणी रूपाने फुलू लागला. वर्षागणिक ह्या उस्तावला बहर येत गेला. कार्यकर्ते वाढत होते तुटपुंजी वर्गणी जमा होऊ लागली होती तरी पण उस्तव दिमाखात साजरा होत होता, नंतर उत्सवाला खरी झळाळी येत गेली ती सन १९६५ पासून. ह्या कालावधीत आणखी काही नवीन कार्यकर्त्यांची भर पडली. माननीय प्रकाश शेठ, हरिकिसन पी. लोहार, शंकर विष्णू वाघधरे, अबुशेठ, किसान पुजारी, सदाशिव लाड, मनोहर काळोखे, जगदीश प्रसाद श्रीवास्तव, जसवंतराय भायाणी, शंकर (मेहेता) थोरात, जगदीश पडते, दगडूभाऊ चिकणे, मुकुंद मेस्त्री,नामदेव काळे, वसंत काळे, वसंत काळोखे, गुणवंत आंबेरकर, आनंत चव्हाण, अशोक वाघधरेआणि अनेक बालगोपाल कार्यकर्ते. हे सर्व कार्यकर्ते मोठया उस्ताहने मंडळात सहभागी झाले. दरवर्षी वेगवेगळे सुंदर देखावे, उत्तम चलचित्रे देखणी श्रीची मूर्ती उस्तावत भर टाकत होती. श्रीची मूर्ती श्रीधर कांबळी खूप उत्तम रित्या बनून देत होते. कृष्णराव बालकृष्ण पडते यांनी आपल्या दाजीबा हाउसचा ओटा स्थापनेसाठी कायम स्वरूपाने दिला होता. माननीय प्रकाश शेठ मोठ मोठी नाटके आणि सीने कलावंतांचे कार्यक्रम दरवर्षी देत होते. होता होता शंकर विष्णू वाघधरे यांनी मंडळासाठी स्वतंत्र खोलीची सोय करून दिलीहोती. खोलीची सोय होताच मंडळातील कार्यकर्ते उस्तावासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू जमा करू लागले. यामुळे दरवर्षी लागणाऱ्या सर्व वस्तू भाड्याने आणि विकत आणण्याचा खर्च वाचू लागला आणि महत्वाचे म्हणजे याचा आदर्श इतर मंडळे पण घेऊ लागले. हळू हळू मंडळाचा विस्तार वाढू लागला. नवचैतन्याच्या तरुण मंडळीनी मंडळाचा व्याप हातात घेऊन यात नाविन्याची भर टाकीतगेले. रजत महोउत्सव, सुवर्ण महोउत्सव, हिरक महोउत्सव मोठया दिमाखाने पार पडले आणि आता ७५ वे वर्ष “अमृत महोउत्सव” मोठया उस्ताहाने, आनंदाने आणि भव्य पणे पार पडणार यात शंकाच नाही.

अमृत महोउत्सवाचा उस्ताह सर्व कार्यकर्त्यांच्या नसानसात भरला आहे. जानेवारी महिन्यापासूनच अमृत महोउत्सवाची तयारी मोठया उस्ताहने सुरु झाली. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या. सर्वाना कामे वाटून दिलीगेली. अमृत महोउत्सवाच्या स्वरुपाची आखणी भव्य करण्याचे ठरले. संपूर्ण गल्ली सुशोभित आणि आकर्षक करण्याचा प्रस्ताव झाला. विघ्नहर्त्याचा सोहळा भव्य दिव्या करण्यासाठी वर्गणी आणि देणगीवर भर देण्याचे ठरले. अमृत महोउत्सवाची स्मरणिका आकर्षक करण्याचे ठरले. दर्शनासाठी आलेले भाविक समाधानाने घरी जातील अशी आकर्षक मूर्ती आणि गल्ली आकर्षक सजावटआणि मंगलमय वातावरण ठेवून उत्सव साजरा करण्याचा विडा मंडळाने उचलला आहे. मंडळात पहिल्या पासून ज्या कार्यकर्त्यांनी गणेशोस्तव उत्तमरीत्या साजरा केला वर्गणी आणि देणग्या भरघोस आणून मंडळ सुस्थितीत ठेवले त्या जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याचे ठरले. जे जुने कार्यकर्ते वेगवेगळ्याठिकाणी जाऊन राहिले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून विसार्जानापार्यांत मंडळात हजार राहून उस्त्वाची शान वाढवावी असे सर्वाना आव्हान करण्यात येत आहे.

विघ्नहार्त्यचा सुबकपणा, डामडौल, भव्यपणा भाविकांच्या मनात कायमचा कोरण्यात येईल. तसेचगल्लीत सजावट मंगलमय वातावरण भाविकांना मोहून टाकेल यावर विशेष लक्ष दिले जाईल. भाविक घरी जातील तेव्हा त्यांनी म्हटले पाहिजे “गणेशमूर्ती असावी ती अशी, मंडळाची शिस्त असावी तर ती अशी उस्तवअसावा तर असा”….

अखिल खेतवाडीच्या पहिल्या वहिल्या विघाहार्त्याला शीरसाष्टांग नमस्कार. विघान्हार्ता आपला उस्तव, कार्यकर्त्यांच्या चुका पोटात घालून उत्सव सर्वांग सुंदर करून घेईल यात शंका नाही. विघानाहार्त्याने सर्व कार्यकर्ते तसेच त्याच्या सर्व कुटुंबियांना आणि अखिल भारतीय जनतेला सुखी ठेवावे. त्यांचावर कसल्याही प्रकारची संकटे येऊ नयेत, सर्वांच्या इच्छा पूर्ण करावूया अशी विघ्नहर्त्याकडे हात जुडून नम्र विनंत.