गणेश आगमन

यावर्षी गणेशचतुर्थी ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत आहे. पूर्व तयारी आणि सजावट यासाठी गणेश मूर्ती १५ ऑगस्ट २०१६ या दिवशी मोठ्या मिरवणुकीने आणण्यात आली. मिरवणूक लालबाग गणेश टोकीज येथून निघून सातरस्त, मुंबई सेन्ट्रल, नवजीवन सोसायटी, खेतवाडी ब्याक रोड वरून गल्लीत येईल. अमृत मोहोउत्सवी विघ्नहर्ता ढोल - ताशाच्या गजरात गुलाल उधळीत मोठ्या दिमाखात आसनस्थ होईल.स्थ होईल.

गणेशोस्तव मंडळाची माहिती

अखिल खेतवाडीतील सर्वात पहिला गणपती. खेतवाडीच्या विघ्नहर्त्याची स्थापना सन १९३७ साली झाली. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ ब्रिटीशांची काळी राजवट, हुकुमत व अत्याचारांचा जोश वाढत होता. ”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच“ या ठाम मतावर असणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी एकजुटीसाठी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोस्तव व ब्रिटीशांची देशाबाहेर हकालपट्टी करण्यासाठी व जनजागृतीसाठी मांडलेले प्रस्ताव व मते यांचे प्रोस्ताहन घेऊन खेतवाडी २रि ३रि गल्ली सन १९३७ काळातील एक शूर, हिम्मतवादी गणेशभक्त भोलाराम मारुती चोरगे यांनी गणेश भुवनच्या (जुनी डायाभाई घेलाभाई चाळ) ओट्यावर गणेश स्थापना केली. त्यांना हिम्मतीने साथ दिली ती बटर दादा, मद्रास, धर्मा आणि आकारामबुआ यांनी. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या ह्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने गणेशोस्तव साजरा करू लागले. सन १९४२ च्या काळचा एक प्रसंग घडला तो असा ….

गणेशोत्सव २०१६

संपूर्ण खेतवाडीतील पहिला वाहिला मानाचा गणपती “खेतवाडीचा विघ्नहर्ता…. ”माव्याच्या मोदकासारखे गोड आणि मधुर नाव खेतवाडीतील भक्तांनी आपल्या आवडीचे केले. गणेशोस्तव मंडळाची स्थापना सन १९३७ झाली आणि आता सन २०१२, ७६ वर्षे मंडळ चवीने आणि टिकविणे हि साधी गोष्ट नाही. या साठी मंडळात चिकाटी आणि एकी असणे हे फार महत्वाचे आहे. आपल्या मंडळाने हे सिद्ध करून दाखवले आहे कि आपले मंडळ किती चिकाटीचे आणि मजबूत आहे, हि चिकाटी अबाधित राहील यात शंकाच नाही...

२०१२ हे अमृत महोउत्सावी वर्ष याची तयारी जानेवारी महिन्या पासूनच सुरु झाली. सर्व कार्यकर्ते मोठ्या नवीन दमाने आणि उस्ताहने कामाला लागले आहेत छोटे बाल कार्यकर्ते सुद्धा स्वतःहून तयारीला लागलेत. अमृत महोउत्सावाचा उस्तव धूम धडाक्यात आणि दिमाखात कसा होईल याची योजना कार्यकर्त करू लागलेत. या अमृत महोउत्सावासाठी उस्तव दिमाखात आणि शिस्तबद्ध होण्यासाठी वेग-वेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आणि प्रत्येक समितीला कामे वाटून दिली.

सर्व प्रथम सुरक्षा समिती. दर्शनाला आलेल्या भाविकांची काळजी घेणे व त्यांची सुरक्षा करणे हे सममितीचे काम असेल. त्यानंतर भाविकांना पद्धतशीररीत्या दर्शन घेण्यासाठी पद्धतशीर रांग लावणे व गर्दी होवू न देणे हे काम हि समिती पाहील. संपूर्ण दिवस स्वयंसेवकाचे काम करणारे कार्यकर्ते यांना अल्पोउपहार, चहा पाणी देणे हे काम खाद्य व्यवस्था समिती करेल. सर्व वर्गणीदार आणि देणगीदार यांच्याकडून जास्तीत जास्त वर्गणी व देणगी गोळा करणे तसेच जाहिराती मिळवून त्यांची स्मरणिका तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. दर्शनासाठी काही नामांकित व्यक्ती, राजकीय नेते, गणेशोस्तव मंडळाचे कार्यकर्ते हि मंडळी आल्यास त्यांचा सत्कार करणे, त्यांची व्यवस्था पाहणे हि कामे स्वागत समिती करेल. त्यानंतर महत्वाचे काम म्हणजे कुणाला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली किंवा तब्यतीचे काही परिणाम होत असले तर प्रथमोपचार समिती त्यांची काळजी घेईल आणि वरील सर्व समित्यांवर लक्ष देणे, Shivaji Meharaj त्यांना काही अडचणी आल्यास त्यांना मदद करणे हि कामे व्यवस्थापन समिती करेल. आम्हाला पूर्ण खात्री आहे कि वरील सर्व समित्या आपापले काम चोख करतील, जेणेकरून सर्व भाविकांना कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही आणि भाविक विघ्नहर्त्याचे दर्शन पद्धतशीरपणे घेऊ शकतील. विशेष भर सुव्यवस्थेवर देण्यात येईल. जे भाविक दर्शासाठी येतील ते नक्कीच म्हणतील “गणेशोस्तव असावा तर असा. गणेशोस्तव मंडळ असावे तर असे….”

खेतवाडीच्या विघ्नहर्त्याची गेल्या ७५ वर्षे एक विशेष परंपरा आहे गणेश भक्त गणेशमूर्तीसाठी जे हार आणतात त्या सर्व भक्तांचे हार गणेशमूर्तीच्या गळ्यात घातले जातील. त्यामुळे भक्ती समाधानाने घरी जातात. हे परंपरा कायम पुढे चालू राहणार आहे.